पहिली ते बारावी निवासी शाळा - ऐतवडे खुर्द, ता. वाळवा
होमी बाबा बाल वैज्ञानिक व जवाहर नवोदय (TSE) गुणवत्ता शोध परीक्षा तयारी.
५ वी ते ८ वी: सातारा सैनिक स्कूल, NMMS आणि स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शन.
मॅटवरील कबड्डी व कुस्तीचे अद्यावत प्रशिक्षण उपलब्ध.
MHT-CET, आर्मी, नेव्ही, एअर फोर्स व पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी.
आमच्या संस्थेत निसर्गरम्य व आरोग्यदायी शालैय परिसर असून महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व नैतिक गुणांचा विकास करण्यावर आमचा भर आहे.
अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद, सुसज्ज प्रयोगशाळा आणि अद्ययावत ग्रंथालय ही आमची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. आम्ही विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासासाठी विविध उपक्रम राबवतो.
१) महिन्यातून एक दिवस पालक भेट असेल.
२) पालक भेटीव्यतिरिक्त पाल्यास भेटता येणार नाही.
३) भेटीची वेळ: सकाळी ९ ते सायं. ६ अशी राहील.
४) पाल्याजवळ खाऊ, पैसे व मौल्यवान वस्तू ठेवता येणार नाहीत.
५) शैक्षणिक फी दिलेल्या मुदतीत भरून पूर्ण करावी.
६) शिस्त मोडल्यास अगर गैरवर्तन केल्यास प्रवेश रद्द केला जाईल.
७) पालकांनी पाल्याची आरोग्य माहिती अगोदर द्यावी.